Type Here to Get Search Results !

मुख्‍याधिकारी तडवी अडकले; २८ हजाराची लाच घेतांना पकडले रंगेहाथ

मुख्‍याधिकारी तडवी अडकले; २८ हजाराची लाच घेतांना पकडले रंगेहाथ

यावलचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याविरूद्ध अनेक तक्रारी होत्‍या. त्‍यांवर आरोप देखील करण्यात आले होते. यातच काही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील नगरपालिका सदस्‍यांकडून करण्यात आली होती. यातच आज त्यांना  ; २८ हजाराची लाच घेतांना पकडले रंगेहाथ लाच लुचपत विभागाने पकडले : यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना कंत्राटदाराकडून लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. साठवण बंधार्‍याच्या कामांसाठी कंत्राटदाराकडून लाच मागितल्‍याचे हे प्रकरण उघडीस आले. यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी कंत्राटदाराकडून पैशांची मागणी करत साठवण बंधार्‍याचे काम मिळवून देतो असे सांगून लाच मागितली होती. याबाबत संबंधीत  कंत्राटदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत पथक तयार करण्यात आले

सदर पथकाने यावल नगरपालिकेत सापळा रचला. दुपारी एकच्या सुमारास मुख्याधिकारी बबन तडवी हे कंत्राटदाराकडून २८ हजार रूपयांची रक्‍कम घेत असताना रंगेहाथ पकडले गेले. तडवी यांना अटक केल्‍यां नं तर पथक जळगावकडे रवाना झाले. अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या या कारवाईमुळे नगरपालिका परिसरात खळबळ उडाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies