प्रकल्प कार्यालय तळोदा अनुकंप टेबलावर काम करणाऱ्या कर्मचारी यांचा जाहीर निषेध व कार्यवाही ची मागणी.
मोलगी (प्रतिनिधी) आदिवासी समाजाच्या हितासाठी आदिवासी समाजाच्या नावाने. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु सामान्य व्यक्ती कामानिमित्त सदर कार्यालयात गेल्यावर योग्य मार्गदर्शन न करता उडवाउडवीची भाषा या कार्यालयात काम करणारे कर्मचारी
वापरत आहेत. व मनमानी कारभार करतात. दिनांक 29/07/0221 रोजी मी स्वतः रवींद्र सना पाडवी महाराष्ट्र राज्य आदिवासी टायगर सेना संघटना संथापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अनुकंप फॉर्म कामी भेट दिली असता अनुकंम्प टेबलावर काम करणारे श्री विशाल साहेबांनी मला सांगितले कि एका तासाने ये नाहीतर येऊ नको माझ्याकडे टाइम्स नाही असे सांगण्यात आले. यावरून असे दिसून येते कि सामान्य व्यक्ती यांना हे कसे उत्तर किंवा मार्गदर्शन करत असतील. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र राज्य आदिवासी टायगर सेना संघटना तर्फे या कर्मचाऱ्या विरुद्ध जाहीर निषेध करतो. व सदर कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून सदर कर्मचारी यांचा टेबल बदलण्यात यावा अशी मागणी /निवेदन आमच्या संघटने मार्फत देण्यात आले आहे व सदर कर्मचारी यांच्यावर कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र राज्य आदिवासी टायगर सेना संघटना संपूर्ण महाराट्रात आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे.