सुशिक्षित बेरोजगार युवकांचा आक्रोश मोर्चा...
राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रखडलेल्या परीक्षा, रखडलेल्या नियुक्त्या,मेगाभारती, पोलीस भरती,व सरळसेवा भरती लवकरात लवकर घेण्याबाबत- स्पर्धा परीक्षा भरती कृती समिती, महाराष्ट्र राज्या च्या वतीने मोर्चा चे आयोजन....
सर्वांनी आप-आपल्या तालुका आणि जिल्हा च्या ठिकाणी दि.14 जुलै बुधवार ला आंदोलन करण्याचे स्पर्धा परीक्षा भरती कृती समितीचे आवाहन...
प्रतिनिधी/रोहन आदेवार
वर्धा: कोरोनाचे कारण देत 2 वर्षांपासून रखडलेल्या MPSC च्या भरती प्रक्रिया व राज्य सरकारच्या बेरोजगार युवकाबाबतच्या निष्क्रीय धोरणामुळे स्वप्निल लोणकर सारख्या जवान व उमद्या पोराने आत्महत्या केली.
कोविड -19 चा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण व अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्यातील पदभरती, परीक्षा ,नियुक्त्या रखडलेल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. कोरोनामुळे आधीच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती डबघाईला लागली असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे मागील 2-3 वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. याला सर्वस्वी राज्य सरकारचे नित्कृष्ट धोरण जबाबदार आहेत असा आरोप स्पर्धा परीक्षा भरती कृती समितीकडून करण्यात आला.
मागील 3 वर्षांपासून जून 2018 ते जून 2021 या कालावधीत राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य संख्या 6 ऐवजी 2 अशी आहे. मागील सरकारने आणि आपल्या सरकारच्या सुद्धा याकडे दुर्लक्षच केले. यामुळे निर्णय प्रक्रिया संथ झाली व आयोगाच्या अधिकारांवर गदा आली. MPSC ही संविधानिक संस्था असून सुद्धा सरकारची बाहुली बनून काम करत आहे हे लोकशाहीच्या स्वस्थासाठी घातक आहे.
3 वर्षांपासून पोलीस भरती नाही विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे, मागच्या सरकारने महापरिक्षा पोर्टल मार्फ़त मेगाभारती घेतली त्यात अनेक घोटाळे झाले त्यामुळे आपल्या सरकारने पोर्टल बंद केले त्याचप्रमाणे आजच्या सरकारमधील आरोग्य भरतीत सुदधा अनेक घोटाळे उघडकीस आलेले. गरीब विद्यार्थी मेहनत करत सरकारी नोकरीचे स्वप्न बघत आहे परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे हे विद्यार्थी मागे पडतात व ज्यांच्याकडे पैसे आहेत असे विद्यार्थी 10 ते 20 लाख रुपये देऊन नोकऱ्या घेत आहेत. हे भयावय आहे विद्यार्थी युवक हवालदिल होत आहे.
व यातून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्महत्या प्रमाण वाढत असून दि.14 जुलै 2021 बुधवार रोजी वर्धा येथे मोर्चा होणार असून सर्वांनी आप-आपल्या तालुका आणि जिल्हा च्या ठिकाणी दि.14 जुलै बुधवार ला आंदोलन करण्याचे स्पर्धा परीक्षा भरती कृती समितीचे आवाहन...
खालील मागण्या राज्य शासनाने पूर्ण कराव्यात या संदर्भात आक्रोश मोर्चा होणार आहे-
1) MPSC 2021 चे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे.
2) UPSC च्या धर्तीवर नियमित MPSC च्या घेण्यात याव्या.
3) 2020 ची MPSC Combine Group B ची तारीख 10 दिवसात जाहीर करावी.
4) MPSC राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्या 6 असायला पाहिजे परंतु मागील 3 वर्षांपासून दोनच सदस्य MPSC चा डोलारा सांभाळत आहेत.येत्या 10 दिवसात संपुर्ण सदस्य भरले जावे.
5) MPSC आणि महाआईटी च्या रखडलेल्या सर्व परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात व अंतिम निकाल लावावे.
6) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (3600) व PSI ची चाचणी (4500) व मुलाखती लवकरात लवकर घेण्यात याव्या.
7) रखडलेल्या 413 अधिकाऱ्यांना नियुक्त्या लवकरात लवकर देण्यात याव्या.
8) राज्य सरकारच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या सर्व परीक्षा खासगी कंपनीकडून न घेता , MPSC मार्फतच घ्याव्यात, तसेच कंत्राटी पद्धतीने रद्द करून पूर्णवेळ नोकऱ्या द्याव्यात.
9) मागील 3 वर्षांपासून पोलीस भरती झालीच नाही. येत्या 10 दिवसात महापरिक्षा पोर्टलवर भरून घेतलेल्या 5 हजार भरती बाबत व आता महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या 12,538 जागा बाबत अधिसूचना जारी करावी. अधिसूचना जारी करावी.
10) येत्या 10 दिवसात सरळसेवा व मेगाभरती साठी अधिसूचना जारी करावी.
11) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याचे दोन वर्षे फुकट गेले त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा संपू शकते त्यासाठी वयोमर्यादेत 2 वर्षाची वाढ करावी व लवकर यासंबंधीचा शासन आदेश काढावा.
12) महापरिक्षा पोर्टलवर 16 वेगवेगळ्या परीक्षेचे अर्ज भरून घेतले होते, पण अजूनही त्यांची परीक्षा झाली नाही. ह्या परीक्षा MPSC मार्फत लवकरात लवकर घेण्यात याव्या.
13) 'महाआईटी' या सरकारी कंपनी वर SIT लावावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
14) पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला भ्रम दूर करण्यासाठी 1600 मीटर की 5 किलोमीटर व पाहिले शारीरिक चाचणी की पहिले पेपर याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर जाहीर करावी.
15) MPSC ची अभियांत्रिकीची परीक्षा पास असणारा हुतात्मा स्वप्नील लोणकरला महाराष्ट्र शासनाने 1 कोटीची मदत करावी.
16) 2019 पर्यंत 2 लाख पदे महाराष्ट्रात रिक्त आहेत. याबाबत मेगा भरती काढून ती लवकरात लवकर MPSC मार्फत भरण्यात याव्या.
17) पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्लासेस व अभियासीकेला परवानगी देण्यात यावी.
वरील मागण्या या महाराष्ट्रातील बेरोजगार व स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या आहे.जर स्वप्नील लोणकर सारख्या अजून कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील.आणि 2024 ला तुम्हाला आम्ही घरचा आहेर देऊ अशी माहिती स्पर्धा परीक्षा भरती कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आली.