मंदाणे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करा: महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर सेना संघटनेची मागणी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करा,अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर संघटनेने शहादा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवून मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणे गावात दिनांक ०९ जुलै २०२१ रोजी एका अल्पवयीन भांडी धुन्यासाठी अल्पवयीन मुलीला बोलून जबरदस्ती करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो.फिर्यादी वडीलाच्या सांगण्यावरून,मुलीचे वडील मजूरीचे पैसे मागण्यासाठी गावात गेले होते व मुलीची आई धुणीभांडी करण्यासाठी गावात गेली असता पीडीत १० वर्षाची मुलगी त्याच्या लहान भावंडांना सांभाळण्यासाठी घरीच होती.तेव्हा पैशाचे आमिष दाखवून संशयित आरोपी विश्वास रूपचंद पाटील रा.मंदाणे यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सदर घडलेला प्रकार पिडीत मुलीने आईला सांगितला.त्यावरून मुलीच्या वडीलांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपीला अटक झाली असून भा.द.वि.कलम ३५४( अ)१,२,४अंतर्गत ,अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ कलम,लैंगिक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ अन्वये (पोक्सो)११(१),(२),(६)कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आदिवासी समाजावरील मुलींवर व महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढतच आहेत. म्हणून अशा घटनेसंबंधित आरोपींना कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे,जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल. तरी सदर घटनेतील संशयित आरोपीला कायदेशीर फाशीची शिक्षा करण्यात यावी.हीच नम्र विनंती. अन्यथा आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने प्रशासनाला दिला आहे.