सांगली-मिरज प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेविका स्वाती पारधी यांची कौतुकास्पद कामगिरी
प्रतिनिधी आशिष आढळ
सांगली वार्ताहर-मिरज प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेविका सौ स्वाती पारधी यांना निर्मिता दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे श्री गणेश वाईकर यांनी फोन केला की आम्ही १३० जण छतिसगड वरून आलो आहोत, कृष्णा नदीला पूर आला असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात जाणारे सर्व मार्ग बंद आहेत तरी आमची जेवणाची व राहण्याची व्यवस्था होईल का,सौ स्वाती पारधी यांनी लगेच होकार देत त्यांनी अभिजित कांबळे यांना फोन करून विषय सांगितला व जेवण मिळेल का तर ते ही हो म्हणाले आणि या १३० जणांना जेवण व राहण्याची सोय माहेर आश्रम येथे केली यावेळी उपस्थित कार्यकर्ते रोहित कांबळे, सनी कांबळे, शुभम कांबळे, विधान कांबळे, आणि सौ स्वाती पारधी,सौ स्वाती पारधी या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील असून त्यांनी आज पर्यंत सांगली-मिरज मध्ये नगरसेविका म्हणून खूप छान काम केले आहे त्याच्या या कामामुळे त्यांचे कौतुक होत आहे.