Type Here to Get Search Results !

मारेगाव येथे भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघा ची संयुक्त मीटिंग संपन्न

मारेगाव येथे भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघा ची संयुक्त मीटिंग संपन्न

मीटिंग मध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी हूसेनभाऊ ढोबरे यांची निवड करून अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली
   
जिल्हा प्रतिनिधी:रोहन आदेवार

रविवार दि.२५ जुलै २०२१
      मारेगाव येथील शेतकरी भवनाच्या सभागृहात सर्वांची संयुक्त मिटींग घेण्यात आली. त्या मध्ये  राजदीप सर महासचिव RMBKS महाराष्ट्र राज्य, मा. विजयराज प्रदेश उपाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा,  पडोळे साहेब,
 मा. मडावी साहेब, मा. मेश्राम साहेब, मश सय्यद इम्रान हे प्रमुख मान्यवरच्या स्थानी मिटींग ला उपस्थित होते.
   या मिटींगचे अध्यक्ष  राजदीप सर यानी मार्गदर्शन करताना बहुजनांच्या हक्क अधिकाराची लढाई लढण्यासाठी व आमच्या महापुरुषांचे आंदोलन चालवण्यासाठी मारेगाव येथे मीटिंग घेण्यात आली. संविधानाने दिलेले हक्क अधिकार आजच्या घडीला शासक वर्ग काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष-UPA,बीजेपी व त्यांचे सहकारी पक्ष-NDA कसे संपवत आहे हे खूब प्रभावी पने मा. राजदीप सरांनी सांगितले.
   मा. विजयराज यांनी संविधानाने दिलेले हक्क अधिकार समाप्त होत आहेत तर काय तुम्ही पाहात राहणार काय? चला उठा जागे व्हा रात्र वैऱ्याची आहे असे म्हणत देशात होणाऱ्या जनआंदोलनासाठी तयार व्हा म्हणत उपस्थित लोकांमध्ये हुंकार भरला तर सर्व लोकांच्या अंगावर काटे उभे राहिले आणी ह्या जनआंदोलनात आम्ही सामील होणार म्हणत अनेकांनी वेगवेगळ्या संघटनांची जबाबदारी घेतली. जबाबदारी घेतलेल्या सर्वांनी संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करनार असे सांगितले.
    विजयराज सरांनी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी हुसेन ढोबरे यांची निवड केली तर, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी मा. कुणाल गेडाम यांची निवड केली. भारत मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष पदी मा. आनंदराव मसराम यांची निवड केली. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी  राहुल आत्राम यांची निवड केलीत. राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका अध्यक्ष पदी मा. हरिभाऊ रामपूरे यांची निवड केली. भारतीय बेरोजगार मोर्चा तालुका अध्यक्ष पदी मा. प्रशांत टेकाम यांची निवड करण्यात आली. MN टीव्ही मीडिया प्रभारी पदी  अमोल कुमरे , अनंतराव गोवर्धन यांची निवड करण्यात आली.
वरील सर्व पदाधीकारी यांच्या निवडी बद्दल सर्वाचे अभिनंदन करण्यात आले.या मिटिंगला बरेच लोकांची उपस्थिती होती. ही मिटींग यशस्वी करण्यासाठी .राहुल दातार सर,  तुळशीराम  सरपंच,  बळीराम आत्राम,  हूशेन ढोबरे  राहुल आत्राम, अनंतराव गोवर्धन यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies