दारव्हा येथे बिरसा क्रांती दलची नविन कार्यकारणी गठीत
प्रतिनिधी /आशिष आढल
दारव्हा येथे बिरसा क्रांती दलची नवीन कार्यकारणी बिरसा क्रांती दलचे संस्थापक अध्यक्ष दशरथजी मडावी यांच्या अध्यक्ष ते खाली दारव्हा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकी मध्ये तालुका अध्यक्ष म्हणून हनुमंत पारधी,उपाध्यक्ष नंदकिशोर खरबडे,सचिव विजय काळे,महासचिव सुभाष वाडगे,कोषाध्यक्ष गणेश कोळवते यांची निवड करण्यात आली असुन बिरसा क्रांती दलाच्या महिला अध्यक्षा म्हणून सौ कविता मानतुटे,उपाध्यक्ष सौ.मंजली साखरकर
सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून रंगराव काळे (माजी.शिक्षणाधिकारी ) पुसद .डी.बी.अंबुरे उमरखेड,शरद चांदेकर यवतमाळ,अतुल कोवे यवतमाळ उपस्थित होते. नवीन पदाधिकारी यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे..पुढील
वाटचालीस शुभेच्छा अनेक दिग्गज व विविध क्षेत्रातील मान्यवर कडून मिळत आहेत.