Type Here to Get Search Results !

पोलिसांच्या वाहनाचा अपघात; दोन पोलीस कर्मचारी जखमी

पोलिसांच्या   वाहनाचा अपघात;  दोन पोलीस कर्मचारी जखमी

जळगाव जिल्ह्यातील घटना
 

जळगाव पोलिसांच्या शासकीय वाहनाचा  मालेगावजवळ  अपघात झाल्याने  दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
जळगाव पोलिसांच्या वाहनास  मुंबई-आग्रा महामार्गावरील पोलिस चौकीजवळ  कंटेनरने धडक दिल्याने दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी घडला.
 बाळू आधार पाटील व मोहंमद सलीम शेख हे शासकीय सुमो वाहनाने (क्रमांक- एमएच १९ एम ०७४१) मालेगावहून जळगावला परतत असतांना हा अपघात घडला. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. या अपघातात बाळू आधार पाटील व मोहंमद सलीम शेख हे दोघे कर्मचारी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्याने तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies