करणवाडी येथील अवैध दारु विक्रेत्यावर पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी कारवाई केले ती योग्यच
करनवाडी येथील नागरिकांनी दिले तहसीलदार तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन
मारेगाव तालुका प्रतिनिधी,/पंकज नेहारे
करणवाडी येथील अवैध दारू विक्रेत्यावर मारेगाव पोलीसांनी केलेली कारवाई ही पारदर्शक असून त्याविरोधात संबंधीत कुटुंबीयांनी मारेगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणला बसुन ते बिनबुडाचे असल्याचा आरोप करनवाडी येथील नागरिकांनी केल आहे.
दि.३ जून रोजी मारेगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी करणवाडी येथील अवैध दारू दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकुन अवैध देशी दारू सह अवैध देशी विक्री करणाऱ्या अपंग महिला व पुरुषावर कारवाई करण्यात आली होती. परंतु आमच्यावर करण्यात आलेली कारवाई ही चुकीची असून मला अपंग असतांनाही शारीरिक व मानसिक त्रास दिला असा आरोप करीत अपंग महिला सीमा अफरोज खान व तिचा पती अफरोज खान यांनी मारेगाव पोलीस स्टेशन समोरच उपोषणाला सुरुवात केली. परंतु सुरू असलेले हे उपोषण बिनबुडाचे असल्याचा आरोप करीत गावातील नागरिकांनी तहसीलदार यांचेमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी केलेल्या कारवाईचे करनवाडी येथे दारू बंद करून त्यांचे समर्थन केलेले आहे.
करनवाडी येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या अवैध दारू विक्री विरोधात सन२०१९ मध्ये करणवाडी बसस्टॉपवर अवैध दारू बंद करण्यासाठी आंदोलन एक तास चक्काजाम करण्यात आला होता. या अवैध दारूविक्रीमुळे करनवाडी येथे अनेकाचे घर उद्ध्वस्त झाले संसार असून कमी वयाच्या मुलांना या दारूचे व्यसनाच्या आहारी गेल्याचे निवेदनात म्हटले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही अवैध दारूविक्री सुरू असून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांना अवैध दारू बाबत माहिती दिली होती.व त्यावरून त्यांनी करनवाडी येथील अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई केली. कारवाई योग्यच असून त्यावेळी मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेला होता. या सर्व कारवाईला आम्ही साक्षदार आहोत. केवळ आकसापोटी त्यांनी ठाणेदारांवर आरोप करीत उपोषण सुरू केले असे म्हणत आमचे गाव दारूमुक्त करायचे असून आम्हाला मंडलवार साहेबांसारखाच अधिकाऱ्यांची आवश्यकता असून त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे व खोटे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी शाळा सुधार समिती अध्यक्ष राजेंद्र खडसे, तंटामुक्ती अध्यक्षलीलाधर काळे,किरण आडे, हिना नैताम, मारोती नैताम, प्रीतम जोगी,कविता खडसे, रेखा श्रीपतवार, रवींद्र जोगी, विमल उरकुडे, सुनील गायकवाड, मनोज वादाफळे, प्रभाकर वाटेवर, केशव बदखल,मनीषा मिश्रा, अनिता टेकाम,कवडू गारघाटे, ओमप्रकाश मिश्रा यांच्यासह मोठ्या प्रमाणावर करनवाडी येथील नागरिक उपस्थित होते.