महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या अमरावती विभागीय महिला अध्यक्ष पदी श्रीमती शारदा गायमुखे यांची निवड
सचिन मेश्राम
यवतमाळ महाराष्ट्र भर कोतवाल हितासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून अहोरात्र काम करत रहाणारी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना म्हणून ओळख आहे. कोतवाल बांधवाच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना असुन या संघटनेच्या प्रथमच श्रीमती शारदा गायमुखे यांची निवड महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या अमरावती विभागीय महिला अध्यक्ष पदी राज्य उपाध्यक्ष गिरीश थेर यांनी अमरावती येथे
पार पडलेल्या बैठकीत एक मताने निवड करण्यात आली यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर, अमरावती जिल्हा अध्यक्ष संदीप पळसपागार ,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भास्कर भगत, वाशीम जिल्हा अध्यक्ष भिल्ल पाटील यांच्या उपस्थित ही निवड केली असल्याने सर्व स्तरातून नवनियुक्त अमरावती विभागीय महिला अध्यक्ष श्रीमती गायमुखे यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे..
पुढील वाटचालीस शुभेच्छा अनेक दिग्गज व विविध क्षेत्रातील मान्यवर कडून मिळत आहेत.