अल्पवयीन प्रियकरानेच पाजले प्रेयसी व तिच्या मुलांना विष; प्रियकरावर गुन्हा दाखल
चौघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यान दोन जणांचा मुत्यु झाल्याने मोताळा तालुक्यातील टेंभी गाव हादरले होते. दि.४जुलैच्या मध्यरात्री टेंभी येथील वृषाली समाधान तायडे वय ३० अनुभव समाधान तायडे वय वर्षे ६ यांचा विष प्राशन केल्याने मुत्यु झाला होता.तर वैभव समाधान तायडे वय वर्षे ११आणी १७वर्षीय प्रियकर याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेने संपूर्ण तालुक्यातील खळबळ उडाली होती. या घटनेने तालुक्यातील विविध तर्क लावले जात होते. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली अल्पवयीन प्रियकरानेच तिघा मायलेकांना विष पाजल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अल्पवयीन प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन प्रियकरा सोबत गेल्या ६महिन्यापासून प्रेमसंबंध होते. याबद्दल वृषालीच्या सासू आणी दिराने वृषालीला ८दिवसापूर्वी विचारणा केली असता तिचे सासु आणी लहान दिरासोबत भांडणही झाले होते. माझे कुठेही संबंध नाहीत असे ती घरच्यांना ठणकावून सांगत होती. यातच वृषाली हिच्या पतीचाही वृषालीवर विश्वास असल्याने तोहि आईसोबत माझी पत्नी ''तशी'' नाही म्हणून वाद झाले होते. अल्पवयीन प्रियकर गांवातच शेती आणी क्रेन मशीनचे काम पाहतो वहिनी वहिनी म्हणता म्हणता त्याचे वृषाली सोबत प्रेमसंबंध तयार झाले दि.४जुलैच्या रात्री वृषालीचा पती समाधान आणी वृषालेचे सासरे हे शेतात हरणापासुन पिकांचे रक्षण करण्यासाठी गेले
याच संधीचा फायदा घेत वृषालीच्या अल्पवयीन प्रियकर घरी गेला ही बाब अंगणात झोपलेल्या सासूबाईच्या लक्षात आल्याने सासूने शेजारीच राहणाऱ्या युवराज तायडे पुतण्याला याला बोलावून घेतले. व वरिष्ठांच्या कानावर घालावी म्हणून युवराजने गावचे सरपंच आणी पोलीस पाटलांना बोलावून घेतले सरपंच आणी पोलीस पाटील यांनी सांगितल्यानुसार ते आले तेव्हा घरातील लाईट बंद होता. घरातील दरवाजाला आतून कडी लावलेली होती. खिडकीतून आवाज देवूनही आतून उत्तर येत नव्हते. मात्र विषारी औषधांचा वास येत असल्याने पोलीस पाटील यांनी ही बाब धामणगावचे पोलीस निरीक्षक बढे यांना फोन करून सांगितले
पोलीस निरीक्षक यांनी दरवाजा तोडण्याचा आदेश दिला. दरवाजा तोडला तेव्हा घरातील तिघे मायलेक व.अल्पवयीन प्रियकर विष प्राशन करून गंभीर अवस्थेत होते. त्यांना लगेच उपचारासाठी मलकापूर येथे रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच वृषाली व तिचा लहान ६वर्षीय चिमरडि मुलगा अनुभव याचा मुत्यु झाला. या घटनेतील १७ वर्षीय प्रियकर आणी वृषाली हिचा मोठा मुलगा वैभव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान १७वर्षीय प्रियकराची पोलिसांनी चौकशी केली असता प्रियकराने तिघांना विष पाजल्याचे समोर आले असून पुढील तपास धामणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बढे पोलीस उपनिरीक्षक ममता बादे करीत आहे.