वरपोड येथील आदिवासी महिलेला मारहाण करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी
सचिन मेश्राम
यवतमाळ जिल्ह्यामधील झरीजामणी तालुक्यातील वरपोड येथे आदिवासी जमातीच्या महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली याप्रकणाची वन संरक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वर निलंबनाची अनुसूचित जाती जमाती च्या त्याच्यावर प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली. पांढरकवडा व संरक्षण विभागाचे अधिकारी यांच्या वतीने वघाची शिकार प्रकरणात गाव वरपोड तालुक्यातील झरीजामणी जिल्हा यवतमाळ येथील आदिवासी कोलम जमातीच्या पोडावर तीनशे वनसंरक्षण अधिकारी व कर्मचारी आणी शंभर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने संशायित पुरूषांना पकडण्यासाठी कारवाई करण्यात आली. परंतु
या कारवाईहीत वरपोड गावातील एकूण आदिवासी कोलाम महिलांना विनाकारण अमानुष मारहाण करण्यात आली.गर्भवतीमहिला व एक अल्पवयीन मुलगी होती त्यांना सुध्दा व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी गर्भवती महिला व अल्पवयीन मुलीला बदम मारहाण केली .अनुसूचित क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचे काम केले आहे. आदिवासी कोलाम समाजात वाघाला कोलाम समाज कुलदैवत वाघोबा या नावाने संबोधले जाते त्यांनी परंपारिक पध्दती नुसार पुजा करतात वाघाला मारल्या जात नाही तसे टिपेश्वर अभयारण्यतील
एकही वाघ शिल्लक राहिले नसते. विनाकारण आदिवासी कोलाम समाजातील महिलांना मारहाण करण्यात आली. वन संरक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून अनुसूचित जाती व जमाती अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी मारेगाव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे .यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मारेगाव तालुका अध्यक्ष सुमित गेडाम उपाध्यक्ष राजुभाऊ सिडाम ,गंगाधर लोनसावळे महाराज ,भय्याजी कनाके,गणेश लोनसावले,शंकर मड़ावी ,सोनू गेडाम निलेश आत्राम,भाऊराव मेश्राम,दिगाम्बर आत्राम,मारोती आत्राम,बालाजी टेकाम इत्यादी निवेदन देताना उपस्थित होते.