Type Here to Get Search Results !

हवामान खात्याचा इशारा.. पुढील ३ दिवस अत्यंत धोक्याचे

हवामान खात्याचा इशारा.. पुढील ३ दिवस अत्यंत धोक्याचे


मुंबई, राज्यात पावसाने जोरदार दडी  मारली आहे. कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिरोली, अकोला भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अद्याप कोल्हापूरची परिस्थिती नियंत्रणात आली नाही.
अशात हवामान खात्याने पुढील ३ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यासमोरील संकट कायम आहे. मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्याचा परिसर, सातारा, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तसेच २७ जुलैपर्यंत मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात सलग दोन दिवस अतिवृष्टी आणि जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
२४ ते २७ जुलैदरम्यान रायगड, सिंधुदुर्ग ठणे पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. पुढचे ३ ते ४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहे. कोकण आणि गोव्यात २४ तारखेलाही हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies