४५वर्षीय इसमावर चाकू हल्ला
मारेगाव तालुक्यातील गदाजी बोरी येथील घटना
पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील गदाजी बोरी येथील एका ४५ वर्षीय इसमावर धारदार चाकूने हल्ला चढून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गदाजी बोरी येथे २३ जुलै रोज शुक्रवारच्या सायंकाळी ९ वाजताचे दरम्यान घटना घडली. विशाल पंजाब उईके (२७) रा.बोरी असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.तर सोनबा कोरझरे (४५) रा.बोरी (गदाजी)असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. मुलांच्या तक्रारी नुसार जखमी सोनबा व मुलगा अंकुश कोरझरे (२२), मंगल कोरझरे (१५) हे घटनेच्या दिवशी प्रभाकर नामक इसमाला दापोरा येथे सोडुन देऊन परतगदाजी बोरी येथे आले असता. यादरम्यान गावातील पान ठेल्यावर खर्रा घेऊन घरी परत जात असताना गदाजी महाराज देवस्थानच्या ग्रेट जवळ आरोपीचा भाऊ मंगेश सोबत सोनबा बोलत असतांना,आरोपी विशाल उईके हा मागुन येवून विशालच्या हातात असलेल्या धारदार चाकूने हल्ला सोनबा यांच्यावर चढविला.यात
जखमी सोनबा कोरझरे घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला असता दोन्ही मुले धावत जाऊन वडिलाला उपचारासाठी मारेगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ नेण्याचा सल्ला दिला विशाल पजाब उईके घटनेनंतर फरार झाला होता दरम्यान फरार झालेल्या आरोपीस मारेगाव पोलिसांनी गदाजी बोरी येथून अटक केली आहे जखीम इसमाच्या मुलाने विशाल पजाब ऊईके यांच्या विरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून विशाल ऊईके यांच्या वर मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन याघटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे।