तलवार फिरवत दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला जेरबंद
लोणार ।तालुक्यातील वढव येथे हातात तलवार दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला लोणार पोलिसांनी जेरबंद करत गुन्हे दाखल केल्याची घटना २९ जुलै रोजी घडली आहे याबाबत सविस्तर असे की वढव येथील आरोपी धम्मपाल गोपाल वाठोरे हा वढव येथे हातात तलवार घेत फिरत दहशत निर्माण करत होता माझ्या भावा विरुद्ध कोण साक्ष पुरावे देतो त्याला मी बघून घेतो व त्याच्या विरुद्ध कोणी साक्ष पुरावे देऊ नये यासाठी तो ग्रामस्थांना
धमकावत होता त्याचे हे रौद्र रूप बघता ग्रामस्थांनी भयभीत होत आपले दारे-खिडक्या बंद केल्या या घटनेमुळे महिला आबालवृद्ध भयभीत झाले होते या घटनेची माहिती लोणार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळताच त्यांनी तात्काळ आपले सहकारी दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर,पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे,पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे,गोपनीय विभागाचे विठ्ठल चव्हाण,पो का तेजराव भोकरे,पो का विशाल धोंडगे,चालक गजानन ठाकरे यांनी मोठ्या शिताफीने आरोपी धम्मपाल गोपाल वाठोरे याला जेरबंद करत त्याच्या ताब्यातील तलवार जप्त केली आरोपीविरुद्ध लोणार पोलिसांनी शस्त्र अधिनियम १९५१ नुसार कलम ३७ (१)(C)१३५ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर करीत आहे