मोटर सायकल वरील युवकासह महीला गंभीर
कळंब (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील बाभुळगाव रोडवरील आष्टी फाट्यावर दि. ३१ जुलै २०२१ चे सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान कळंब वरुन जाणाऱ्या स्विप्ट डिझायर क्रमांक एम एच ३२/एएच ९७३९ च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने चालवून रोडने जात असलेल्या ॲक्टिवा गाडी क्रमांक एम एच २९/ बी क्यु ८०५७ ला कट मारुन समोर असलेल्या मोटरसायकल हीरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच २९/ एव्ही ०३०९ ला जबर धडक दिल्याने मोटर सायकल वरील वैभव अशोक टाले वय २० वर्ष व महीला सौ. वंदना दिलीप दरणे वय ४२ वर्ष रा. पार्डी (सावळापुर) हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहिती नुसार वर्धा येथिल स्विप्ट डिझायर चा चालक अमोल प्रेमालाल बागडे वय ३१ वर्ष रा. गोरक्षण वार्ड वर्धा हा कळंब वरुन कोठा येथे जात असता भरधाव वेगात वाहन चालवुन आष्टी येथिल मुलगी कु. गौरी कोरडे ॲक्टिव्हा गाडीने फाट्यावर येत असता स्विप्ट कारने तीचे वाहनाला कट मारल्याने मुलगी खाली पडली व किरकोळ जखमी झाली. त्यानंतर पार्डी गावावरुन होंडा मोटरसायकल स्वार बाभुळगाव रोडच्या फाट्यावर येत असता मोटरसायकल ला स्विप्ट कारची धडक बसल्याने त्यावरील युवक व महीला यांच्या डोक्याला, हातात, पायाला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले. असता त्यांना कळंब ग्रामीण रुग्णालय नेले तेथुन यवतमाळ शासकीय रुग्णालयात पाठविले होते. तर तेथुन सेवाग्राम रुग्णालय नेल्याचे समजले. सदर घटनेची कळंब पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीसांनी घटना स्थळी जाऊन अपघात ग्रस्त तीनही वाहने पोलीस स्टेशन मध्ये आणले असुन वृत्त लिही पर्यंत फिर्याद दाखल झाली नव्हती.
विशेष म्हणजे आष्टी फाटा हा चौफुलीचा रस्ता असल्याने आष्टी गावातुन तर समोर पार्डी गावातून कळंब ते कोठा रोडवर यावे लागत असल्याने या ठिकाणी गतीरोधक बसविणे गरजेच�