लग्नाचे स्वप्न दाखवून विधवा महिलेचे शारीरिक शोषण
विधवा महिला गरोदर, आरोपी विरुध्द भादंवी ३७६ चा गुन्हा दाखल
वणी -: शहरातील सर्वोदय चौकात वास्तव्यास असलेल्या 38 वर्षीय विधवेला लग्नाचे आमिष दाखवून सतत तीन वर्ष वेळोवेळी लैंगिक शोषण केले. पीडिता गर्भवती राहिल्यामुळे 'तो मी नव्हेच' ची भूमिका घेणाऱ्या २८ वर्षीय युवकांवर वणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लक्ष्मण किशोर खेडेकर असे फरार आरोपीचे नाव आहे, तो येथील सर्वोदय चौकात राहतो. त्याच परिसरात विधवा महिला राहत होती. विधवेच्या असाह्यतेचा फायदा घेत त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मागील तीन वर्षांपासून तिचे वारंवार शोषण केले. यामध्ये महिला ८ महिन्याची गर्भवती राहिल्याने तिने त्याला लग्नाची गळ घातली होती.
लग्ना करिता सतत च्या तगाद्यामुळे लक्ष्मण ने 'तो मी नव्हेच' अशी भूमिका घेऊन लग्नास नकार दिला त्यामुळे पीडितेने दि. २८ जुलै ला वणी पोलीस स्टेशन गाठले व आपल्यावर सातत्याने झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना देताच वणी पोलिसांनी आरोपीवर भादंवी कलम ३७६, ४१७ नुसार गुन्हा नोंद केला आहे. याची भनक आरोपीला लागताच त्याने शहरातून पळ काढला आहे.पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माया चाटसे करीत आहे.