राज्याचा दहावीचा निकाल आज जाहीर, निकाल 99. 95 टक्के
या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकाल केला जाहीर
मुंबई : राज्याचा निकाल 99.95 टक्के, कोकण विभागाचा निकाल 100 टक्के असून मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला.
राज्याचा निकाल 99. 95 टक्के, कोकण विभागाचा निकाल 100 टक्के असून मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांकरिता दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार केला आहे. इयत्ता 10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात गुरुवारी माहिती दिली. सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुले असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. राज्यात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण
राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.
मुलांचा निकाल 99.94 टक्के, मुलींचा निकाल 99.96 टक्के, 12 384 शाळांचा निकाल 100 टक्के 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करणार आहे
957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 22384 शाळांचा निकाल शंभर टक्के
83262 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 22384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
किती विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
एकूण आठ माध्यमांतर्गत 2020-21 वर्षातील एसएससी (इयत्ता दहावी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुले असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन 2021 मध्ये इ. 10 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर केले जातील.