स्वतंत्र भिल प्रदेश राज्याची मागणी नवापुर निवासी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी द्वारे मा राष्ट्रपती यांना महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर सेना संघटना तर्फे निवेदन.
प्रतिनिधी = मोलगी आदिवासी भील समाजाच्या सामाजिक, राजकिय, आर्थिक, उन्नतीसाठी तसेच सुरक्षेसाठी स्वतंत्र भील प्रदेशाची आवश्यकता असुन भील प्रदेश राज्याची निर्मिती करावी याच्या मध्ये महाराष्ट्र राज्यातील समाविष्ट जिल्हे नंदुरबार, धुळे,
जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, व गुजरात राज्यातील जिल्हे बनासकाठा, साबरकाठ, अरवली, महिसागर, पंचमहाल, बडोदा, दाहोद, छोटाउदयपुर, नर्मदा, डाग, भरूच, सुरत, तापी, नवसारी, वलसाड, दमण दीव, दादरा नगर हवेली, व मध्य प्रदेश राज्यातील जिल्हे नीमच, मंदसौर, रतलाम, झाबुआ, अलीराजपुर, बडवाणी, धार, खरगोन, खडवा, ब-हाणपुर, तसेच राजस्थान राज्यातील जिल्हे बाडमेर, जालोर, पाली, सिरोही, राजसमंद, चित्तौडगढ, उदयपूर, डुगरपुर बासवाडा, प्रतापगढ, असे आहे तर भील समाज हा पुर्वीपासुन भुमीचा मालक आहेत भील समाजाचे राज्य कटकारस्थान रचून हिरावण्याचे हिरावण्याचे आले होते त्या मुळे या समाजाचा विकास झाला नाही. समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र भील प्रदेश राज्याची आवश्यकता आहे अशी मागणी रविंद्र सना पाडवी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर सेना संघटना यांनी केली आहे.