Type Here to Get Search Results !

ग्राम. प बामनवाडा येथील युवकांनी सरपंच श्रीमती. भारती पाल यांचे मानले आभार!

ग्राम. प बामनवाडा येथील युवकांनी सरपंच श्रीमती. भारती पाल यांचे मानले आभार!

   प्रतिनिधी/चंद्रपूर

गेल्या कित्येक वर्षापासून ग्राम. बामनवाडा येथील जनता ही वेगवेळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देऊन त्रासली होती.जुने ग्राम.प. सरपंच तथा सदस्य या सर्वांना समस्या निदर्शनास आणून सुद्धा समस्याचे निवारण होत नव्हते,मग ती समस्या पथदिवे ची असो,नाली साफ करण्याची असो,पाण्याची असो अथवा रोडाची असो.परंतु नवनिर्वाचित महिला सरपंच श्रीमती.भारती पाल यांनी बामनवाडा जनतेचे ग्राम.प. च्या कामाबद्दल चे झालेले नकारात्मक विचारांना सकारात्मक्तेकडे वळविले.
           गेल्या पाच महिन्यात त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा ही स्वतः तेथील जनता करीत आहे,आणि हीच त्यांच्या कामाची पावती समजल्या जात आहे. ज्या प्रमाणे एक महिला आपले घर सांभाळते,त्याच प्रमाणे सत्ता हाती घेतल्यास ग्राम.प. सुद्धा सांभाळू शकते यांचे जिवंत उदाहरण म्हणजे बामनवाडा महिला सरपंच श्रीमती. भारती पाल व त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारी त्यांची संपूर्ण सदस्य टीम आहे.
             बामनवाडा ग्राम.प. येथे पाच महिला सदस्य असून चार पुरुष सदस्य आहे,यावरून भारत सरकारचे महिला सशक्तीकरण/सक्षमीकरणाचे प्रयत्नाचे उत्तम उदाहरण दिसून येते. 
            ग्राम.प बामनवाडा यांनी केलेल्या कामामुळे बामनवाडा येथील युवकांनी सरपंच, उपसरपंच,सदस्य व कर्मचारी यांचे बिरसा क्रांती दल चे जिल्हा युवा अध्यक्ष अभिलाष परचाके,अक्षय मरस्कोल्हे,अक्षय गाठे,अनिकेत नगराळे,रोहित नगराळे,दर्शन नगराळे,ज्येष्ठ समाजसेवक देवानंद रांजिकर,ऑफ्रोट चे तालुका अध्यक्ष डॉ.मधुकर कोटनाके यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.सोबत बामनवाडा येथील सुशिक्षित युवकांसाठी वाचनालय ची सुविधा करून देण्यात यावी करीता निवेदन सुद्धा देण्यात आले,आणि सर्व सदस्यांनी त्यास सकारात्मक प्रतिक्रिया दिली.यावेळेस उपस्थित सदस्य,ग्राम.प. सरपंच श्रीमती. भारती जगदीश पाल, उपसरपंच अविनाश टेकाम,सदस्य समिश्रा झाडे,सुजाता मेश्राम,मंजुषा कोडपे,प्रफुल चौधरी,सर्वानंद वाघमारे,भारती पंकज करमनकर,राकेश वाघमारे कर्मचारी वर्ग, ग्रामसेवक  दत्ता कवठाडकर,पंकज करमनकर,अश्विनी मेश्राम,प्रदीप पाल,मंगेश गेडाम,सुमित उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies