Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
  
      सचिन मेश्राम/यवतमाळ

       महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची जिल्हा कार्यकारिणी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री. शशिकांत निमसटकर यांनी नुकतीच जाहीर केली. २२ जून रोजी यवतमाळ येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी या नेमणुका करतांना विभागीय समतोल साधत नेमणुका करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गार्डन मध्ये झालेल्या बैठकीत बहुमताने मंगेश ढेकळे यांची कार्याध्यक्ष म्हणून, महागाव येथील सुदर्शन गोस्वामी यांची जिल्हा उपाध्यक्ष, पुसद येथील सुधीर चव्हाण जिल्हा सचिव, राळेगाव येथील उमेश चांदेकर सहसचिव, दारव्हा येथील प्रशांत प्रभाते  कोषाध्यक्ष, केळापूर येथील राहुल काळे संघटक,तर पुसद येथील श्रीमती शारदा गायमुखे , अमरावती विभागाच्या विभागीय महिला संघटक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. तर महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून राळेगाव येथील छाया दरोडे आणि संगीता काळे तसेच रविना धुळध्वज यांची जिल्हा महिला संघटक म्हणून नेमणूक करण्यात आली. सर्व नवीन सभासदांचे जिल्हाध्यक्ष शशिकांत निमसटकर यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा सुध्दा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies