मारेगाव तालुक्यात वीजेच्या लपण्डावाने नागरिक त्रस्त
२४ तासात २४ वेळा ये जा
मार्डी परिसरातील प्रकार,,
प्रतिनिधी / सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात मार्डी परिसरातील चोपण चनोडा भागात वीज मंडळाच्या वेगवेगळ्या कारनाम्यानंतर आता " २४ तासात २४ वेळा ये जा "हा नवीन कारनामा सुरु झाला असून सर्व सामान्यांपासून शेतकरी वर्गही या वीजमंडळाच्या अजब कारभाराला कंटाळलेले दिसत आहेत. वीज मंडळाचे वेगवेगळे कारनामे उघडकीस येत असतानाच आता या वीज मंडळाचा हा अजब कारनामा सुरु झालेला आहेत. एखादे दिवशी पाऊस असेल तर वीज जाणे समजू शकते. पण जेव्हा ना पाऊस असतो , ना विजा चमकतात , ना वातावरण खराब असते तरीही सर्व जण कोरोनाचा कहर सुरु असल्याने घरी सुखाने ज़ोप यावी मनुन फैन कीव्हा कूलर चालू करते, जेव्हा रात्रीच्या वेळेस
शांतपणे झोपी गेलेले असतात नेमके त्याच वेळेस या वीज मंडळाच्या विजेला 'प्रॉब्लेम' येतो आणि वीज जाते . वीज गेल्यावर सर्वजण बाहेर येऊन बघतात तर सर्वकाही आलबेल असते पण मग वीज का गेली हे कोणालाही कळत नाही. तरीपण अशाही परिस्थितीत एखादा ग्राहक माहिती घेण्याच्या उद्देशाने फोन लावतो पण फोन मात्र उचलल्या जात नाही . बरे रात्री अकरा-बारा वाजता गेलेली वीज लवकर येईल या आशेने सर्वसामान्य बसलेले असतात. पण कधी कधी गेलेली वीज यायला सकाळ देखील होऊ लागतात. त्यामुळे वीज नेमकी कोणत्या कारणामुळे जाते आणि यायला एवढा उशीर का लागतो हे अजूनही कळले नाही. एखाद्याच्या घरी वीज मीटर नसताना वीज बिल देणे. एका महिन्याचे बिल कधी कधी लाखावर देणे , वारंवार विद्युत प्रवाह खण्डित होणे असे अनेक प्रकार सुरु असतानाच आता या "रात्रीस खेळ चालेचि" मार्डी परिसरात खमंग चर्चा सुरु आहे. दिवसासोबतच रात्रीचाही विद्युत पुरवठा सुरळीत करून मार्डी परिसरातील जनतेला योग्य सेवा द्यावी अशी मार्डी परिसरातील नगरिक वीज मंडळाकडून अपेक्षा व्यक्त करीत आहेत.