Type Here to Get Search Results !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिली आ. सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट आ. सुलभाताई खोडके यांनी स्वागत करून मानले नानाभाऊ पटोले यांचे आभार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिली आ. सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट  
आ. सुलभाताई खोडके यांनी स्वागत करून मानले नानाभाऊ पटोले यांचे आभार 

      अमरावती /मारेगाव वार्ता

अमरावती १२ जून : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत . दरम्यान शनिवार १२ जून रोजी त्यांनी अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या रेल्वे स्टेशन - बस स्थानक मार्ग स्थित जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली .यावेळी आ. सौ सुलभाताई खोडके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले  यांनी आ. सुलभाताई खोडके यांचे जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊ नये यासाठी काही स्थानिक प्रमुख नेत्यांनी अथक प्रयत्न केले . मात्र विरोध झुगारुन प्रदेशाध्यक्ष  नानाभाऊ पटोले  यांनी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली .व स्वागत स्वीकारून आ.सौ . सुलभाताई खोडके यांच्याशी स्थानिक  विषयावर चर्चा केली . याबद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.  
यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडकेंसमवेत माजी महापौर ऍड. किशोर शेळके, रीना नंदा, अविनाश मार्डीकर, अंजली चौधरी, चेतना ठाकरे, नगरसेवक प्रशांत डवरे, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, यश खोडके, प्रशांत धर्माळे, निलेश शर्मा, माजी नगरसेवक भूषण बनसोड, रवींद्र इंगोले, गजानन बरडे, अशोक हजारे, ऍड. सुनील बोळे, ऍड. अमित जामठीकर, नितीन भेटाळू, संदीप आवारे, महेंद्र सोमवंशी, जुम्मा हसन नंदावाले, संजय बोबडे, दीपक कोरपे, शशिकांत चौधरी, मनोज केवले, रामदास इमले, अजय कोळपकर, योगेश सवाई, प्रमोद महल्ले, रामभाऊ नवाथे, मनीष देशमुख, शक्ती तिडके, कर्नालसिंग राहल, शुभम पारोदे, आशिष सगने, गुड्डू तिवारी, प्रशांत यावले, अमोल वानखडे, राजेश कोरडे, दिनेश देशमुख, पप्पू खत्री, दत्तात्रय बागल, प्रवीण भोरे, निलेश ठाकरे, प्रशांत पेठे, बंडू निंभोरकर, प्रा. रमेश काळे, दिलीप कडू, धीरज श्रीवास, पिंटू मानकर, डॉ. अजय बोन्डे, मनोज भेले, जयकुमार नागे, भोजराज काळे, बबलू वाडेकर, बाळासाहेब देशमुख, नाजुकराव मोहोड, जितेंद्रसिंह ठाकूर, श्रीधर देशमुख, चेतन वाठोडकर, विजय वाघूळकर, शिवपाल ठाकूर, विठ्ठलराव हीरोडे, पिंटू यादव, ऍड. शोएब खान, सनाउल्ला ठेकेदार, नदीम उल्ला सर, गुड्डू हमीद, सनाउल्ला सर, गाझी झहरोश, अफसर बेग, साबीर पहेलवान, हाजी रफिक, अबरार साबीर, राजू भाई, समी उल्लाह पठाण, राजू पहेलवान, अफजल चौधरी, ऍड. शब्बीर हुसेन, हबीबखान ठेकेदार, फारुखभाई मंडपवाले, सादिक रजा, मोहम्मद शारिक, बिलाल खान, तन्वीर आलम, शेख रेहान, सनी भैया, नसीम खान पप्पू, सादिक कुरेशी, आदींसहित कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies