Type Here to Get Search Results !

शहरातील युवकांनी वेधले नागरिकांचे लक्षसर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडेवाटप करत युवकांनी साजरा केला पर्यावरण दिन.

शहरातील युवकांनी वेधले नागरिकांचे लक्ष
सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडेवाटप करत युवकांनी साजरा केला पर्यावरण दिन..

जिल्हा प्रतिनिधी/ रोहन आदेवार
              यवतमाळ

वणी:पर्यावरणाच्या रक्षणासाठी आज अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात. वृक्षांची लागवड व जोपासना करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. जिल्ह्यात काही सामाजिक संस्थांनी देखील झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वणी येथील युवकांनी पुढाकार घेत सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडे वाटप करून अनोख्या पद्धतीने पर्यावरण दिन साजरा केला.

      कोरोना विषाणू जन्य परिस्थितीत कोरोना बाधितांना ऑक्सिजनची गरज भासत होती. रुग्णांचा आकडा पाहता देशात ऑक्सिजन पुरवठा यात फार मोठी तफावत निर्माण झाल्याने अनेकांचे बळी सुद्धा गेले. यामुळे शहरातील प्रत्येकांनी आपल्या घराच्या आवारात एक झाड लावून त्यांचं संवर्धन करावे. जेणे करून त्यापासून आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळून आपण कोरोना सारख्या आजारावर मात करू असा मानस दाखवत शहरातील काही युवकांनी पुढाकार घेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे २०० विविध झाडांच्या रोपांचे नागरिकांना वाटप करण्यात आले. या झाडांमध्ये कडूलिंब, पिंपळ, बांबू, आवळा, बेहडा, बदाम, बाभूळ, चिंच या झाडांच्या प्रजातीचा समावेश आहे. 
आज पर्यावरण दिनी विविध झाडाचे रोप वाटून शहरातील या युवकांनी पर्यावरण समतोलाचा संदेश देत. पर्यावरण दिनी अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमात शुभम पिंपळकर, शुभम गोरे, सुमंत बच्चेवार, शुभम इंगळे, समीर बच्चेवार यांचा सहभाग होता...
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies