अडणी येथील स्मशानभूमीच्या रस्ताचे भुमिपुजन
अनेक वर्षांपासून अडणी येथे स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मृतदेह रोड शेजारी जाळावे लागत होते.
प्रतिनिधी/ योगेश देठे
जिवंतपणे माणसाला आपल्या जीवनात विविध अडचणींचा सामना करावा लागत असतो मात्र माणूस मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंतिम संस्कार हा एका स्मशानभूमीत व्हावा . मात्र तेसुद्धा माणसाचा मृत्यू
झाल्यावर त्याच्या नशिबी लागत नाही कारण राजकीय पुढारी यात सुद्धा चांगलेलच राजकारण करत असतात हे तेवढे सत्य आहे. कारण केळापुर तालुक्यातील अडणी येथे ठक्कर बाबा यांच्या निधीतून स्मशानभूमीच्या रस्ताचे भुमिपुजन बांधकाम करण्यासाठी दि.१९रोजी भुमिपुजन करण्यात आले यावेळी उपस्थित सरपंच सचिव व तंटामुक्त अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.