Type Here to Get Search Results !

पालकमंत्री संदिपान भुमरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री संदिपान भुमरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर
 
             जिल्हा प्रतिनिधी
     यवतमाळ :रोहन आदेवार
       
यवतमाळ, दि. १४ : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे  १५ व १६ जून रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.

१५ जून रोजी दुपारी १० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व यवतमाळ शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाचा आढावा. सकाळी ११ वा. वनविभागाच्या अधिकाऱ्यासंमवेत शासकीय विश्रामगृह येथे बैठक. दुपारी १२ ते २ राखीव. दुपरी २वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे कोव्हीड-१९
नियंत्रण व उपाययोजना संदर्भात आढावा बैठक व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या पूर्वतयारीचा आढावा.  दुपरी ३ वा. पोलीस मुख्यालय येथे डायल-११२ प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या मोटर सायकल व पोलीस पेट्रोलींग वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम, पोलीस मेस विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन व खनीज विकास निधीतून खरेदी करण्यात आलेल्या तसेच शासनाच्या आरोग्य खात्यामार्फत प्राप्त रूग्णवाहिकेचे लोकार्पण तद्नंतर नूतनीकरण केलेल्या पोलीस ऑफीसर क्लब इमारतीचे उद्घाटन. सायंकाळी ४ वाजता यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन निर्मिती प्लांट, लिक्वीड ऑक्सीजन टँक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये कोवीडबाधीत लहान मुलांच्या उपचारासाठी तयार करावयाच्या कक्षाची पाहणी. सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
बुधवार दिनांक १६ जून २०२१ रोजी सकाळी ७:.३० वा. शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथून  नागपूरकडे प्रस्थान करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies