Type Here to Get Search Results !

साने गुरुजी स्मृतिदिन संपन्न

साने गुरुजी स्मृतिदिन संपन्न

             यवतमाळ
जिल्हा प्रतिनिधी /रोहन आदेवार

वणी येथील महाराष्ट्र बँंक जवळील साने गुरुजी चौकात महाराष्ट्र माऊली साने गुरुजीं यांचा ७२ वा स्मृतिदिन भावपूर्ण  वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, मित्रमंडळ व संस्कार भारती समिती या संस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
      या प्रसंगी साने गुरुजी चौकात त्यांचा प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्या नंतर माधव सरपटवार यांनी साने गुरुजींच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून उपस्थितांचे उद्बोधन केले. 
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. या प्रसंगी  हरिहर भागवत, अर्जुन उरकुडे, प्रमोद सप्रे, कासार सागर मुने, राजेश महाकुलकर, जयंत लिडबिडे, गजानन भगत, सुरेश बन्सोड, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, निलेश चचडा, प्रकाश कौरासे, केतन लाभे, प्रमोद सप्रे, कवडू पिंपळकर, वसंत गोरे, प्रसन्न संद्दलवार, मनीष निमेकर, सुरेश बनसोड,  राम मेंगावर, राजू धावांजेवार, महादेव दोडके, अरुण कावडकर, दीपक भोयर नागरिक इत्यादी उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies