Type Here to Get Search Results !

क्रांतीवीर शामादादा कोलाम संघटना मारेगाव तालुका संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवून

क्रांतीवीर शामादादा कोलाम संघटना मारेगाव तालुका संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवून

  वरपोड  आदिवासी महिलेला मारहाण प्रकरणी  दोषी कर्मचारी व अधिकारी याच्यावर कारवाई करण्याची मागणी.


   प्रतिनिधी / कैलास मेश्राम

वरपोड तालुका झरीजामणी जिल्हा यवतमाळ येथील आदिवासी कोलाम जमातीच्या महिलांना अमानुष मारहाण प्रकरणणातील  वन संरक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनासह अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करा असे मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व संरक्षण विभागाचे अधिकारी यांच्या वतीने दिनांक २५ /४/ २०२१ रोजी वाघीण शिकार प्रकरणात गाव वरपोड तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ येथील आदिवासी कोलाम जमातीच्या वस्तीवर ३०० वन संरक्षण अधिकारी व कर्मचारी आणि शंभर पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने सयंशीत पुरुषांना पकडण्याच्या उद्देशाने दिनांक १९/ ६/ २०२१ ला पहाटे साडेपाच वाजता  कार्यवाही करण्यात आली परंतु या कार्यवाहीत वरपोड गावातील एकूण आदिवासी कोलाम महिलांना विनाकारण मारहाण अमानुष मारहाण करण्यात आले त्यात गर्भवती महिला व एक अल्पवयीन मुलगी होती त्यांनासुद्धा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकारी यांनी बेदम मारहाण केली अनुसूचित क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचे काम केले आहे आदिवासी कोलाम जमातीत वाघाला कुलदैवत वाघोबा या नावाने संबोधले जाते त्यांची परंपरागत प्रतीनुसार पूजा केली जाते वाघाला मारल्या जात नाही तसे असते तर कोलाम समात बहुल क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्यातील एकही वाघ शिल्लक राहिला नसता याकरिता केवळ सायन्स कार्यवाही निमित्त्य विनाकारण आदिवासी कोलाम जमातीच्या महिलांना मारहाण करणाऱ्या वन संरक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नीलंबनासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत दाखल करून आदिवासी कोलाम जमातीला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती याकरिता जिल्ह्यातील आदिवासी कोलाम संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले अन्यथा महाराष्ट्रातील आदिवासी कोलाम जमात संघटनेचा सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने आंदोलन उपोषण करण्याचा इशारा दिला यावेळी उपस्थित  क्रांतीवीर शामादादा कोलाम संघटनेचे पदधिकारी व कार्यकर्ते व आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies