सेतू केंद्र संचालकाने लोन काढून देण्याचे अमिष दाखवुन विवाहित महिलेचा केला विनयभंग
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील कुंभा (इंदिरा ग्राम) येथील सेतू केंद्र संचालक विलास नारायण टेकाम यांनी श्रीरामपुर येथील विवाहित महिलेला आदिवासी शबरी महामंडळाची पाच लाखांची लोन केस करून देतो असे म्हणून यवतमाळ येत चालण्यासाठी सेतू केंद्र संचालक विलासने आग्रह धरला. विलास याचा मान ठेवत दि.२९ रोज मंगळवार १०:३०वाजता पिडीत महिला घरुन दुचाकीवर बसुन करंजी वरून वाठोडा मार्गे जात असताना पिडीत महिलेला सुरू असलेल्या दुचाकीवर तु मला खूप आवडते असे
म्हणून दुचाकी वाठोडा रोड लगत असलेल्या जंगल परिसरात ११:३०वाजतच्या दरम्यान थांबवली. व लगेच महिलेचा हात पकडून संशयित आरोपी विलास यांनी खाली पाडण्याचा प्रयत्न केला असता घाबरलेल्या अवस्थेत पिडीत महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्यावर येवून यवतमाळ येथे मला यायचे नाही असे म्हणून पिडीत महिलेने संशयित आरोपी विलास याला सांगितले. घरी परत येवुन महिलेने पतीला सांयकाळी सर्व हकीकत सांगीतली. दि २९जुन रोजी पतीला सोबत घेऊन मारेगाव पोलीस स्टेशन गाठले असता वाठोडा जंगल परिसर मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नसल्याने पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये पिडीत महिला पतीला सोबत घेवून विलास नारायण टेकाम वय(४५)रा. इंदिरा ग्राम (कुंभा) यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पांढरकवडा पोलीसांनी संशयित आरोपी विरुद्ध कलम ३५४ ३५४(अ) ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुना पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहे.