विहिरीत उडी घेवुन इसमाची आत्महत्या
- बोटोणी येथील घटना
बोटोणी : सुनिल उताने
येथील ५५ वर्षीय इसमाने नातलगाच्या शेतातील विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची बाब आज शुक्रवार सायंकाळी चार उघडकीस आली.
रवी मारोती मिंदेवार असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असुन तो मागील आठवड्या पासुन प्रकृतींने फणफणत होता.वेदना असह्य झाल्याने त्याने आत्महत्या केली असावी असा कयास व्यक्त होत आहे.
अविवाहित असलेले मीन्देवार हे आज पहाटे घरातून बाहेर पडलेत.बोटोणी शिवारात असलेल्या संतोष मीन्देवार या चुलत भावाच्या शेतातील विहिरी जवळ त्याची चप्पल व डबा निदर्शनास आल्याने उपस्थितां नी गळ टाकला असता रवी यांचा मृतदेहच बाहेर आला.
मारेगाव पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास सुरु आहे.