मारेगाव तालुक्यातील कोविड रुग्णांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून द्या!
- उपसभापती संजय आवारी यांचे पालकमंत्री यांना साकडे
मारेगाव : सचिन मेश्राम
दिवसागणिक वाढत असलेल्या कोविड रुग्णांना सेवा देण्यास कमालीची कुचराई होत असल्याचा आरोप करित येथील रुग्णांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी आर्जव मागणी मारेगाव तालुका शिवसेना प्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती संजय आवारी यांनी पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादण मंत्री संदीपान भुमरे यांचेकडे केली आहे.
मारेगाव तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावचा आलेख वाढत असतांना मुलभुत गरजे पासुन हे रूग्ण कोसो दुर आहे.त्यामुळे रुग्णांची कमालीची परवड प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालीत असल्याचे विदारक वास्तव सध्या मारेगाव येथे बघावयास मिळते आहे.त्यामुळे कोविड रुग्णांची होत असलेली कुंचबना पुन्हा आजार वाढण्यात कारणीभूत ठरण्याची संभाव्य शक्यता आहे.तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात अत्यावश्यक सेवेचा पुर्णत: बोजवारा उडाला असतांना रूग्ण कमालीचे प्रभावित होतानांचे चित्र वेदनादायी आहे.
कोविड रुग्णांना लागणार्या अत्यावश्यक सेवा तात्काळ उपलब्ध करुन यात सिलेँडर,फलोमीटर,पीपीई किट,सँनिटायझर,सर्जिकल ग्लोज,डी स्पोजल ग्लोज,प्रोटक्शन गाऊन,मास्क,फवारणी मशीन आदी साहित्य उपलब्ध होणे अनिवार्य आहे.
दरम्यान,कोविड रुग्णांना लागणार्या सोयी तात्काळ उपलब्ध करुन तुर्तास होत असलेली कुचंबणा व गैरसोय थांबावी आणि अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यात यावी यासाठी मारेगाव तालुका शिवसेना प्रमुख व पंचायत समिती उपसभापती संजय आवारी यांनी पालकमंत्री तथा रोजगार हमी,फलोत्पादण मंत्री संदीपान भुमरे यांचेकडे निवेदनातुन मागणी केली आहे.