बारावीची परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करा लाभेश खाडे मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष
प्रतिनिधी:पंकज नेहारे
कोविड-१९ विषाणू संक्रमणग्रस्तांची संख्या दुसऱ्या लाटेत देशभरात वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता . बारावी बोर्डाची परिक्षा रद्द करून विद्यार्थ्याचे मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन मा. उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ विषाणू संक्रमणग्रस्तांची संख्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रा मध्ये मोठ्या प्रमाणात असुन दुसरी लाट संपत नाही तर तिसरी लाट येणार असल्याची
काही तंत्रज्ञानी भाषे केले असुन बारावीची परिक्षा घेतली तर विद्यार्थ्यांना तिसऱ्या लाटे मध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात लागण होऊ शकते सध्या परिस्थिती आटोक्याबाहेर असुन बारावी विद्यापीठाच्या परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या मुल्यमापना नुसार निकाल जाहीर करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदन मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष लाभेश खाडे यांनी पाठवून बारावी विद्यापीठाची परिक्षा रद्द करून मुल्यमापन नुसार निकाल जाहीर करा अशी मागणी करण्यात आली आहे..