दिव्यांग प्रमाणपत्र !
कारंजा (लाड) : - गेल्या वर्षाच्या मार्च 20 पासून, कोव्हिड 19 जागतिक कोरोना महामारीने संपूर्ण जगासोबतच आपला महाराष्ट्र आणि विशेषतः दिव्यांग बांधव हे हवालदिल झालेले आहेत. सर्वच जिल्हा सामान्य रुग्नालय व शासकिय वैद्यकीय महाविद्यालयांमधील दिव्यांग तपासणी आणि प्रमाणपत्र वितरण बंद करण्यात आलेले आहे . त्यामुळे हजारो दिव्यांग बांधवांना , दिव्यांगांना मिळणाऱ्या शासकीय सोई सुविधा सवलतींपासून वंचित रहावे लागत आहे . त्यामुळे कोरोना महामारीचे संकट लक्षात घेत केंंन्द्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने येत्या १ जूनपासून दिव्यांगांना घरपोच ऑनलाईन
प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल दिव्यांगाची सुविधा होणार असल्यामुळे कारंजा येथील महाराष्ट्र अपंग संस्थेचे अध्यक्ष संजय कडोळे व कार्यकत्यांनी समाधान व्यक्त केले आहे . . केंंन्द्रिय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने राजपत्रित अधिसूचना जारी केलेली असून प्रत्येक राज्य प्रशासनाने युडीआयडी पोर्टलचा वापर करून दिव्यांग बांधवांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरीत करणे बंधनकारक केलेले असून केन्द्र शासनाच्या आदेशाचे सर्वच राज्य सरकारांनी पालन करावे असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत .सदरहु ऑनलाईन प्रमाणपत्राकरीता मोबाईल वरून किंवा नजिकच्या सेतू केन्द्रावरून ( कॉम्प्युटर द्वारे) युडीआयडी पोर्टलवर नोंदणी करता येईल त्या करीता प्रत्येक दिव्यांगाकडे स्वतःचा मोबाईल, आधारकार्ड, जुने जिल्हा शल्य चिकित्सकाचे पूर्वीचे अपंगाचे प्रमाण पत्र, शाळेची टिसी व रेशान कार्ड आणि अपंगत्व दर्शविणारा पासपोर्ट फोटो जोडावा लागेल . सदर्हु युडीआयडी प्रमाणपत्रावरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नोकरी भरती प्राधान्य, प्रवास सवलत, अर्थ सहाय्य व व्यवसायाकरीता कर्ज सुविधा मिळण्यास सहाय्यता मिळणार आहे .