मारेगाव येथील गजानन कुक्कलवार यांचे निधन
मारेगाव : सचिन मेश्राम
येथील प्रभाग क्रमांक चार मधील गजानन जगन कुक्कलवार (४०) यांचे अल्पशा आजाराने आज सोमवारला चार वाजताचे दरम्यान यवतमाळ येथे उपचारादरम्यान निधन झाले.गजानन यांच्या अकाली मृत्युने शोककळा पसरली आहे.
मारेगाव येथील अँटोरिक्षा चालक व मालक व्यवसायीक म्हणून परिचित असलेले गजानन हे चार दिवसापूर्वी पासुन आजारी होते.पुढील उपचारार्थ त्यांना यवतमाळ येथे दाखल करण्यात आले.
दिवसागणिक प्रकृती खालावत असतांना उपचारांना प्रतिसाद देत नव्हते.अशातच आज चार वाजताचे दरम्यान त्यांनी यवतमाळ येथे अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले एक मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे.गजानन यांच्या अकाली निधनाने शोककळा पसरली आहे.