Type Here to Get Search Results !

नववधूने नवरदेवाला शितपेयातुन पाजले विष

नववधूने नवरदेवाला शितपेयातुन पाजले विष

 नववधूसह तिन व्यक्तीवर नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, 

सी सी टीव्ही कॅमेरा मुळे   घटनाक्रम उघडकीस
    
    मारेगाव वार्ता
   रोहन आदेवार
  जिल्हा प्रतिनिधी

 कुठलीही नववधू आपल्या होणाऱ्या नवऱ्या सोबत सात जन्माची गाठ बांधून पुढील आयुष्याची स्वप्न रंगीत असताना परंतु नववधू अर्चना गुलाब पवार ह्या नववधूने आपल्या  बहिणी ला व दोन भावाला सोबत घेऊन चक्क भावी नवरदेवाचा मृत्यूचा कट रचला.हा कट लग्नाच्या चार दिवस आधी रचला गेल्या असल्याचे उघडकीस आले. की घटना नेर शहरामध्ये  घडल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे.
नेर तालुक्यातील कोहळा येथील एका २३ वर्षीय किशोर परसराम राठोड या तरुणाचे लग्न बाभूळगाव तालुक्यातील जाबुळनी या गावातील अर्चना गुलाब पवार या तरुणीशी लग्न ठरले होते.रितीरिवाजाप्रमाणे ज्येष्ठ व्यक्तीच्या साक्षीने हे लग्न ठरले. व व या लग्नाचा १९ एप्रिल काढण्यात आले या लग्नाच्या आधी १५ एप्रिल ला नववधूचा किशोरला फोन  आला असल्याने भेटण्याचे ठरले होते दुसऱ्या दिवशी नेर येथे साईबाबा आइस्क्रीम पाँईट येथे ठरले होते तिच्यासोबत तिची बहीण पायल पवार,व दोन भाऊ रवी पवार ,विकी पवार हे सोबत होते.या सर्वांनी आईस्क्रीम  खाल्ल्या नंतर दोन्ही भाऊ तिथून निघून गेले होते
नववधुने  होणाऱ्या नवरदेवाला स्टेशनरी खरेदी करण्यासाठी तिन हजार रुपये मागितले व ते नवरदेवाने दिले, स्टेशनरी खरेदी केल्यानंतर पुन्हा अर्चना ने शितपेय  पिण्याची  मागणी किशोर कडे करण्यात आली. यावेळी तिच्या बहिणीने खरेदी केलेले स्टेशनरी किशोरला दाखवत असताना  किशोरचे लक्ष विचलित केले.व त्याचवेळी अर्चनाने किशोरच्या शीतपेयांमध्ये विषारी औषधे टाकले.व ते शितपेय किशोरने प्राशन केले.असता हा सर्व  घटनाक्रम साईबाबा आईस्क्रीम पाँईट येथील असलेल्या सी सी टी व्हि कॅमेरात कैद झाला. शीतपेये पिल्यानंतर  त्याचा मित्र सचिन भास्कर बसवणाथे यांच्या गाडीवर बसुन कोहळयाकडे रवाना झाले असता आजंती रोडवर युवकाला चक्कर येऊन  कोसळला असता. त्याला त्याच्या मित्राने नेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला यवतमाळ येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये  भर्ती केले असता किशोरवर  उपचार सुरू करण्यात आले व  दहा दिवस उपचार करू किशोर सुखरुप घरी परतल्यानंतर या घटनेची माहिती या किशोरने नेर पोलीस स्टेशन गाठून अर्चना सह तिन व्यक्ती विरुद्ध  तक्रारी केली नेर पोलिसांनी आरोपी विरुद्ध ३०७,१२० बी.३४ भा.द.वि. नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून. पुढील तपास नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार स्वप्रिल निराळे राजेश चौधरी करीत आहे
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies