मारेगाव तालुक्यात आज ११ पॉझिटीव्ह
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्गाचा जोर कायम असतांना आज सोमवार ला ११ जन बाधीत असल्याची माहिती प्राप्त झाली.
मारेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शासकीय रुग्णालया समवेत शहरासह ग्रामिण भागातील दवाखाने तुर्तास फुल्ल आहेत.
परिणामी प्रकृती बरी नसतांना प्रामुख्याने ग्रामिण भागातील रूग्ण खाजगीत उपचार घेण्यावर भर देत असला तरी कोविड तपासणीचा ओघही मोठ्या प्रमाणात आहे.दिवसागणिक शेकडो च्या आसपास तपासणी होत आहे.
दरम्यान आज सोमवार ला प्राप्त माहितीनुसार ६२ जणानी आर .टी.पी.सी.आर तर २८ जनांनी रँपिड टेस्ट केली .यात सकारात्मक परिणाम येवुन केवळ ११ जन पॉझिटीव्ह निघालेत.मात्र गावनिहाय आकडेवारी प्राप्त होवू शकली नाही.
अलीकडे कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावाने मारेगाव तालुक्यातील नागरिकांची डोकेदुखी वाढून जनजीवन प्रभावित झाले आहे.