तालुक्यात केवळ तीन पॉझिटीव्ह
- सलग चौथ्या दिवसाला मारेगाव शहराला भोपळा
- पॉझिटीव्हचा दर आला एक टक्क्यावर
- शहरात एकाचा मृत्यू
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधितांचा दर तब्बल दोन महिन्यानंतर एका टक्क्यावर आला आहे.हे दिलासादायक वृत्त असले तरी तालुक्यातील आज बुधवारला तिघे पॉझिटीव्ह निघालेत.शहरात सलग चौथ्या दिवसाला भोपळा असुन शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे.
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गाची घौडदौडची संथगती दिसते आहे.आज रँपिडच्या एकूण १११ तपासणीत एकही बाधीत निघाला नाही तर आरटी- पीसीआर १८४ जणांच्या तपासणीत केवळ तीन जन पॉझिटीव्ह निघालेत.हे ग्रामिण भागातील आहे.
तालुक्यातील १७० जन अँक्टिव आहेत.आज बरे झालेले २१ आहे.शहरातील ७१ वर्षीय इसमाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. मागील दोन महिन्या पासून बाधीत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होवून तालुक्यातील नागरिकांत धडकी भरविली होती.शासनाच्या लॉकडाऊण व संचारबंदीने रुग्ण संख्येत कमालीची घट होवून मारेगाव तालुक्यात पॉझिटीव्ह चा दर एक टक्क्यावर आला आहे.