अज्ञात वाहनांच्या धडकेत तिघा मित्रांचा मुत्यु
मारेगाव वार्ता
(भुसावळ) दि.२६.तळवेळ गाव येथे तिघे मित्र दुचाकीने राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करत असताना फुलगावाच्या उड्डाण पुला नजिक एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली त्या धडकेत दुचाकीवर बसून असलेले तिघे मित्र यात जखमी झाले व दुचाकी चालक विवेक सुनिल पाटील वय वर्षे१६ याला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मुत्यु झाला
शाम राजेंद्र पाटील वय १६ व देवानंद सोपान पाटील वय१७ दोघांना जळगाव येथील गोदावरी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्या दोघाचा उपचार दरम्यान मुत्यु झाला.हे तिघे मित्र जिल्हा भुसावळ, मु.तळवेल गावचे रहिवासी होते.
तिघे मित्र हे त्यांच्या कुटुंबात एकुलते एक होते तळवेल गावात शोकळा पसरली आहे.