सिंदी ग्रा.पं.चे ऑपरेटर रवी बुरडकर यांचे निधन
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील सिंदी ग्राम पंचायत चे संगणक ऑपरेटर रवी भाऊराव बुरडकर यांचे आज यवतमाळ येथे उपचारदरम्यान निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ४० होते.त्यांच्या मृत्युने सिंधी येथे शोककळा पसरली आहे.
मागील पंचेविस दिवसापूर्वी आजारी होते रवी बुरड कर हे यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार घेत होते.त्यांनी आज बुधवारला अखेरचा श्वास घेतला.सिंधी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ते संगणक ऑपरेटर पदावर कार्यरत होते.त्यांच्या मृत्यूने सिंधी परिसरात शोककळा पसरली आहे.
रवी बुरडकर यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.