यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकाचे पूर्वनियोजन या विषयावर ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन
मारेगाव वार्ता/प्रतिनिधी
रिलायंस फाऊंडेशन व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकाचे पूर्वनियोजन या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दि. १५-०५-२०२१ रोजी करण्यात आले.या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड, पद्धती, अंतर, बियाण्याची निवड, खत व्यवस्थापन,बीजप्रक्रिया कशी करावी, कीड रोग व्यवस्थापन त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा गुलाबी बोण्ड अळी यावर जास्त भर होता तसेच तूर पिकाची लागवड,बियाण्याची निवड, खत व्यवस्थापन, लागवडीचे अंतर, मर रोग व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन तसेच सोयाबीन पिकाची लागवड,पद्धती, बियाणे अश्याप्रकारचे विविध प्रश्न विचारले ऑडिओ कॉन्फरन्स मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला त्यांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे डॉ. डी. एस कंकाळ सहाय्यक प्राध्यापक तथा कार्यक्रम समन्वय तसेच डॉ. प्रमोद मगर कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकाचे नियोजन चांगले होईल आणि उत्पादन आणि खर्चामध्येसुद्धा बचत होईल या अनुषंगाने हा कार्यक्रम उपयुक्त झाला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे प्रफुल बन्सोड प्रकल्प व्यवस्थापक तसेच कार्यक्रम सहायक मनीष मेश्राम यांनी केले.