एज्युकेशन फाऊंडेशनचे कोविड -१९ वर ऑनलाइन मार्गदर्शन ...
प्रतिनिधी/मारेगाव वार्ता
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशभरात त्याचे परिणाम विद्रूप दृश्य लोकांच्या समोर महामारीचे संकट म्हणून उभे झाले आहे. अशातूनच लोकांचा लसी बाबत विश्वास आणि मनोबल तथा आपली सुरक्षा कशी करता येईल यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर कोरोना पासून स्वतःची सुरक्षा आणि जागृती मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले. अशा या कार्यक्रमाची ऑनलाइन बैठक संपूर्ण देशभरात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन " कराना आपली सुरक्षा " या नावाने घेतल्या जात आहे.
नुकतेच यवतमाळ येथील मारेगाव तालुक्यात देखिल ऑनलाइन संपन्न झाली. मारेगाव या तालुक्यातील ५० गावामधील सरपंच , ग्रामसेवक , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , पोलीस पाटील , महिला बचत गटाच्या प्रमुख आदी मान्यवर आणि ५० गावातील स्वयंसेवक सुद्धा उपस्थित होते. या सभेला मार्गदर्शक म्हणून मुंबई तेथील तज्ञ मा. जयदीप निकम सर आणि मा. श्रुती बनसोडे मॅडम यांनी गावातील लोकांनी स्वतःची सुरक्षा आणि घ्यावयाची दक्षता तथा सुरक्षित लस व महत्व , लस नोंदणी कशी करावी तसेच लसीबाबत असलेले गैरसमज दूर करुन लस घेण्याबाबत आव्हान केले. कोविड - १९ वर सखोल मार्गदर्शन केले. तसेच लोकांचे मनोबल आणि लसी बाबतचा विश्वास कायम राहणार यासाठी प्रथमचे मेंटोर लीडर मा. प्रमोद कांबळे सर यांनी माहिती दिली. तर प्रसंगी मारेगाव तालुक्याचे मेंटोर मा. संजय कोरडे यांनी बैठीकीचे रुपरेषा प्रास्ताविक करुन केली. प्रथम क्लस्टर मधील ऑटोमोटिव्ह फोर व्हीलर सेंटर हेड मा.संदीप तंतरपाळे सर वे सहयोगी तसेच इतर मेंटोर सुद्धा उपस्थित होते. सभेला सर्व स्टेक होल्डर ग्रामवासी यांनी आपली शंका व गैरसमज असलेले प्रश्न विचारत समाधान करुन घेतले. कार्यक्रमाची सांगता म्हणून झरी तालुक्याच्या मेंटोर मा. शोभा गडेवार यांनी सर्वांचे आभार मानले. सभेला हजर मान्यवरानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व ऑनलाईन बैठक संपन्न झाली.