खळबळजनक....
मारेगावात दोन गटात तुंबळ हाणामारी
- बाभुळगाव व मारेगाव येथील ११ जनावर गुन्हे दाखल
- खुद्द पोलिसांनीच दिली फिर्याद
मारेगाव : सचिन मेश्राम
कृझर वाहनाने कट मारल्याचे सांगत बाभुळगाव येथील सात युवकांनी मारेगाव च्या युवकां सोबत मारेगावच्या मानसी जनरल स्टोअर्स नजिक शाब्दिक खडाजंगी करित लाठया काठ्यांनी मारहाण केली.हा वाद खुद्द पोलिस सोडवित असतांना पोलिसांना न जुमानता शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या ११ जनावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.दोन गटातील तुंबळ हाणामारी आज दि.१६ दुपारी २ वाजताचे दरम्यान घडली.
पोलिस सुत्रांनुसार ,मारेगाव येथील कृझर क्रमांक एम.एच.२९ ,बी.सी.२३९७ हे वाहन करंजी कडुन मारेगाव कडे येत होती.याच वाहनाच्या मागावुन कृझर क्रं. एम.एच.२९ बी.पी.०८३९ या वाहनातील सात जन खाली उतरित समोरच्या वाहनातील इसमासोबत गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन शाब्दिक खडाजंगी करित वाद केला.हा वाद विकोपाला जावुन बाभुळगाव येथील युवकांनी चक्क लाठया काठ्यांनी मारहाण करित असतांना मार्डी चौक येथे कर्तव्यावर असलेले पोलिस महेश राठोड,आनंद अलचेवार व होंमगार्ड ज्ञानेश्वर मडावी,पवन पिंपळ्कर हे घटनास्थळावर जावुन हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करित होते.मात्र पोलिसांना न जुमानता तळीरामच्या भूमिकेत असलेले काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतांना शासकीय कामात अडथळा निर्माण करित असल्याची फिर्याद खुद्द महेश राठोड या पोलिसाने मारेगाव पोलिसात दिली.त्यानूसार जुबेर खॉन मो.पठाण (२४ ),अलताफ खॉन हमीद खॉन पठाण (२३),जुबेर खॉन जहेर ऊल्ला खॉन (२३),अब्रार खॉन सुजान खॉन पठाण (२४),अमोल सुनिल उइके (२३),शुभम रमेश आस्कर (२४),स्वप्निल अरुण दातार (१७ )हे सर्व जन नेहरु नगर,बाभुळगाव जिल्हा यवतमाळ व सुरज वाढई (२५),मनोज काकडे (३१) दोघे रा.मारेगाव,अतुल निखादे रा.चिंचाळा यांचेवर कलम १४३,१४७,१४९,१६०,१८६,१८८,
२६९,२७१,२/३/४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सुरु आहे.