सलग दुसऱ्या दिवसाला मारेगावला भोपळा
- ग्रामिण भागात तीन पॉझिटीव्ह
- अँक्टिव संख्या १६६ वर
मारेगाव : सचिन मेश्राम
तालुक्याला दिलासादायक बाधितांची आकडेवारी आज सोमवारला समोर आली असतांना केवळ तीन पॉझिटीव्ह ची नोंद झाली.मारेगाव शहर शून्यावर असुन सलग दुसर्या दिवसाला मारेगावला भोपळा मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.मात्र तालुक्यात अँक्टिव रुग्ण संख्येत जंबो वाढ होत १६६ आहे.
मारेगाव तालुक्यात दिलासादायक चित्र असले तरी अँक्टिव रुग्ण संख्येत कमालीची वाढ झाल्याने धाकधूक कायम आहे.आज प्राप्त अहवालात ग्रामिण भागात केवळ तीन बाधितांची नोंद आहे.बरे होत असल्याचे प्रमाणही लक्षणीय असुन आज ३५ जन बरे झालेत.कोविड सेंटरला आज रोजी २९ जन भरती आहे.