गोठ्याला आग , नव्वद हजाराचे नुकसान
- म्हैसदोडका येथील घटना
मारेगाव: दीपक डोहणे
मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील दोन शेतकर्यांच्या गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागुन वैरणा सह शेतीपयोगी साहित्य खाक झाल्याची घटना आज सोमवारला मध्यरात्री दोन वाजताचे दरम्यान घडली.
तालुक्यातील म्हैसदोडका येथील नानाजी डाखरे व हिरालाल घागी यांचे गावातच लागुन असलेल्या दोन वेगवेगळ्या प्लॉटवर गुरांचे गोठे आहे.सोमवारला मध्यरात्री अचानक दोन्ही गोठ्याला आग लागुन यातील वैरन व शेतीपयोगी अवजारे खाक झाले.यात नानाजी डाखरे यांचे किमान ३० हजार तर हीरालाल घागी यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान अचानक आग लागताच गावातील लोकांनी धाव घेत आग विझविंण्यावर नियंत्रण मिळविले.यात कोणतीही जिवितहानी झाली नसुन अशातच सुदैवाने नैसर्गिक वातावरण शांत असल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.परिणामी झालेल्या नुकसानीची मदत तात्काळ मिळण्यात यावी अशी मागणी पिडीत शेतकर्यान्नी प्रशासनकडे केली आहे.तुर्तास आगीचे कारण समजू शकले नाही.