२४ वर्षीय युवतीने विष प्राशन घेवून केली आत्महत्या
मारेगाव वार्ता
प्रतिनिधी सचिन महाजन
हिंगणघाट तालुक्यातील ढिवरी पिपरी येथे २४ वर्षीय तरुणीने घराच्या मागे लागुन असलेल्या शेतात विष प्राशन घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९.३०च्या सुमारास ही बाब उघडकीस आली आहे.मृतक युवतीचे नाव सिमा केशव टवरे वय २४ वर्ष राहणार ढिवरी पिपरी.आज सकाळी सिमा येणे विष प्राशन करून ती घरा शेजारी असलेल्या शेतामध्ये मृत्यू अवस्थेत आढळून आली व तिच्या बाजूला विषारी किटकनाशकाचा डब्बा आढळून आला.
मृतक सिमाच्या वडीलांनी या संबंधी वडनेर पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच वडनेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पंकज मसराम पोलिस कर्मचारी अमोल खाडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला मात्र सिमाने आत्महत्या कोणत्या कारणाने केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.या संबंधी वडनेर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपास वडनेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज मसराम बिट जमादार अमोल खाडे करीत आहे,