दापोरा येथील गोंगो महापुजा रद्द
मारेगाव : सचिन मेश्राम
तालुक्यातील दापोरा येथे दर वर्षाला पेरसापेन गोंगो महापुजनाचे आयोजन करण्यात येते.मात्र यंदा संसर्गजन्य रोगाची पार्श्वभूमी लक्षात घेवुन महापुजा रद्द करण्यात आल्याची माहिती सचिव करण कुडमेथे यांनी दिली.
दापोरा येथे दर वर्षाला गोंडीयन सगासोयरे एकत्र येवुन महापुजनाचे आयोजन करण्यात येते.मात्र यंदा कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव असल्याने हा महापुजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.या वर्षाला गोंडीयन सगा सोयर्यांनी सदरील कार्यक्रम घरीच परिवारासोबत साजरा करावा व आपली पारंपारीक पद्धत कायम राखावी जेणेकरुन आपल्या संस्कृतीचे जतन होईल असे आवाहन जय पेरसापेन पेणठाणाचे अध्यक्ष धर्माजी कुडमेथे,सचिव करण कुडमेथे,उपाध्यक्ष पुनाजी कुडमेथे,सहसचिव चेतन कुडमेथे,उप कोषाध्यक्ष रामकृष्ण कुडमेथे , संजय कुडमेथे,बंडू आडे,पुरुषोत्तम आडे,जलपत कुडमेथे,सोमा करपते,देवीदास कुडमेथे,अजाबराव कुडमेथे,कैलास कोरवते,विकास कुडमेथे,भीमराव कुडमेथे,हुसेन कुडमेथे,शारदा कुडमेथे,सिंधू कुडमेथे,मंदा कुडमेथे,सुनंदा कुडमेथे यांच्या वतीने करण्यात आले आहे.