कोरोना ब्रेकींग...
मारेगाव तालुक्यात ०९ ,शहरात ०२ तर बरे झालेल्यांची संख्या ५६
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील कोरोना संसर्गाच्या प्रामुख्याने बाधितांच्या आकडेवारीत चढउतार बघावयास मिळते आहे.कालच्या तुलनेत आज मंगळवार ला या आकडेवारीत घट होवून तालुक्यात केवळ ०९ जन तर शहरात ०२ जन बाधीत निघालेत.बरे होण्याची
आकडेवारी फुगत असतांना ५६ जन घरी परतले आहे.
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गाने रुग्णांचा क्रम कायम ठेवीत आज नऊ जन बाधीत केले.दरम्यान लॉकडाऊनच्या काळात कमीजास्त प्रमाणातील रुग्णांचा ओघ कायम आहे.शहरातील ओसरलेली संख्या पाहता संचारबंदीचा परिपाक समजल्या जात आहे.परिणामी बरे होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असतांना मारेगाव कोविड सेंटरला आज रोजी १९ जन उपचार घेत आहे.
प्रशासनाने कोरोना संसर्गाची चैन सैल करण्यासाठी तालुक्याच्या व शहराच्या मुख्य स्थळी कोरोना तपासणीचे युद्धपातळीवर प्रयत्न चालविले असुन मारेगाव तालुक्यातील ९५० नागरिकांचा चाचणी अहवाल यवतमाळ प्रयोग शाळेत रवाना केला आहे.यातील बाधितांची आकडेवारी उद्याला स्पष्ट होणार आहे.