युवासेनेचा स्तुत्य उपक्रम, ऑक्सीजन ची गरज असलेल्या गरजु रुग्णांना घरपोच ऑक्सीजन ची सेवा
मारेगाव वार्ता
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
रोहन आदेवार
वणी : सध्या वणीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरातील दवाखान्यात ऑक्सीजनची कमतरता भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सीजनसाठी धावपळ होतांना दिसत आहे.
ही दुरावस्था पाहुन शिवसेनेचे वणी विधानसभा संघटक सुनिलभाऊ कातकडे यांनी ऑक्सीजन सिलेन्डरची व्यवस्था केली असुन युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे आपल्या सहकार्यांना घेऊन गरजु रुग्णांच्या घरी जाऊन रूग्णांना ऑक्सीजन लावुन देत आहे.
आज दि.१० मे रोजी रंगनाथ परीसरातील आशा ठाकुर नामक महिलेला ऑक्सीजन ची आवश्यकता भासली परंतु कुठेही ऑक्सीजन मिळत नव्हते हि बाब युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांना माहिती होताच त्यांनी लगेच त्या महिलेच्या घरी जाऊन तिला ऑक्सीजन लाऊन दिले.
या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.