कुख्यात गुंड आरिफ शहाची हत्या
यवतमाळ येथील घटना
मारेगाव वार्ता
जिल्हा प्रतिनिधी
रोहन आदेवार
यवतमाळ येथील रोहिले बाबा झोपडपट्टीच्या शेजारी नवीन भाजी मंडीच्या मागच्या बाजुला सायंकाळच्या सुमारास कृख्यात गुंड असलेल्या युवकाची हत्या करण्यात आली असून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मृतक हा आरिफ शहा हा कृख्यात गुंड प्रवृत्तीचा होता आरिफ शहा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्या घटनास्थळावर आरिफ शहा या कृख्यात युवकाचा मृतदेह रोहिले बाबा झोपडपट्टीच्या नजिक पडुन असल्याची माहिती यवतमाळ पोलिसांना मिळताच उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी प्रदिपसिंह परदेशी, यवतमाळ शहर पोलीस निरीक्षक प्रदिप सिरस्कर यांनी श्चास पथकासह पोलीस घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाची पाहणी करून कृख्यात गुंड आरिफ शहा असल्याने ओळख पटली
आरिफ शहा हा कृख्यात गुन्हेगार प्रवृत्तीचा असुन त्याच्यावर हत्या, हत्याच प्रवृत्त यासारखे आरिफ शहा वर गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याचा खुन कोणी आणी का केला हे अद्याप तरी स्पष्ट झाले नाही.मात्र पूर्ववैमनस्यातून हा आरिफ शहा याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली असावी पोलीसांकडुन वर्तविली जात आहे. घटनास्थळी पाहणी केली असता मद्यप्राशन केल्याचे लक्षात आले. त्याठिकाणी दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या व ग्लास आढळून आले.आरिफचा खुन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने रात्रीच्या अंधारातही नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती व कोरोनाची खबरदारी घेत पोलीसांकडुन जमा झालेल्या नागरिकांना पाणविण्यात आले व पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करत आहे