कोरोना अपडेट ...
मारेगाव तालुक्यात ०६ पॉझिटीव्ह
- मारेगावात २
- १८ रूग्ण बरे
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्ग ओसरण्याचे संकेत दिसते आहे.आज मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात ०६ जन पॉझिटीव्ह निघालेत.शहरात केवळ ०२ जन बाधीत असुन आज १८ रूग्ण बरे होवून घरी परतले.
मारेगाव तालुक्यात कोरोनाचा वाढत्या आलेखाने दिवसेंदिवस चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.मात्र आज सोमवार ला प्राप्त अहवालात काहीशा दिलासादायक आकडेवारीने सुटकेचा श्वास सोडला.मारेगाव तालुक्यात केवळ ०६ जन तर शहरात ०२ जन पॉझिटीव्ह निघालेत.रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असुन आज १८ जन बरे झाले आहे.
मारेगाव तालुक्यात कडक राबवलेल्या लॉकडाऊण व संचारबंदीने आगामी काळात बाधितांची संख्या रोडावलेली दिसेल अशी अपेक्षा आहे.